विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांचा बडगा

Foto

पहिल्याच दिवशी ४,१२० जणांना ठोठावला ४० लाख ९३ हजारांचा दंड
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील रस्ते अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखा पूर्णपणे अॅक्शन मोडवर आली आहे. मंगळवार (दि.१) पासून शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात विशेष धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विविध भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ हजार १२० दुचाकीस्वारांवर कारवाई करत पोलिसांच्या पथकाने तब्बल ४० लाख ९३ हजार रुपयांचा ई-चलान दंड ठोठावला. यापैकी २७ हजार रुपयांची दंडात्मक रक्कम जागेवरच वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.
वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी
शहरात हेल्मेट सक्तीची मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन चौधरी, रेखा लोंढे, नीतू तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, सिचन मिरधे आदींच्या पथकाने मंगळवारी
हेल्मेट सक्तीची कारवाई राबविण्यास सुरुवात करण्यात आली. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बाबा पेट्रोल पंप चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, सिटीचौक, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, क्रांतीचौक, सिडको बसस्थानक चौक परिसर, ओऐसिस चौक, हर्सल टी पॉईन्ट चौक आदी ठिकाणी विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकावर
हेल्मेट वापरणाऱ्यांना गुलाबपुष्प
▶ शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने हेल्मेट सक्तीची कारवाई मंगळवारी राबविण्यात आली. ही कारवाई करत असताना शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिडको बसस्थानक चौकात हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे कौतुक केले.
हेल्मेट वापरण्याच आवाहन
▶ शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने हेल्मेट सक्तीची कारवाई राबविण्यात येत आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन हेल्मेटचा वापर करुन दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.
कारवाई केली. शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभरात ४ हजार १२० विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांना ४० लाख ९३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीधारकांचा वाहतूक पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.